DURG BHANDAR

Image

Imageदोनेक वर्षांपूर्वी फेसबुक वरील पोस्टमुळे दुर्गभांडारची प्रथम ओळख झाली. सोबतची छायाचित्रे कुतूहल वाढवणारी होती. तेव्हाच `कधीतरी जायचं!’ अशी खूणगाठ मनाशी बांधली. मध्यंतरीच्या काळात अचानक प्रकाशात आलेली ठिकाणं म्हणजे `संधन खोरे’ आणि `दुर्गभांडार’, फारशी प्रचलित नसलेली अनवट वाटेवरची ही दुर्गम ठिकाणं.

Google map वर चाळा म्हणून `दुर्गभांडार’चा आभ्यास झाला होता. या दुर्गाची भौगोलिक रचना मोठी विस्मयकारक आहे. नाशिकजवळ क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गोदावरीचा उगम आहे. त्रिंबक हे गाव डोंगरांनी वेढलेलं आहे. पूर्वेला ब्रह्मगिरी आहे, तर दक्षिणेकडे पंचलिंगी डोंगरांची माळ आहे. गोदावरीचा उगम ब्रह्मगिरीवर होतो, परंतु ही गंगा पायथ्याशी असलेल्या गंगाद्वार येथे पुन्हा प्रकट होते. ब्रह्मगिरीला  खेटून उत्तरेकडे `दुर्गभांडार’ आहे.

Image

Image

003

004

006

007

008

010

दक्षिणोत्तर पसरलेल्या सहयाद्रीचा  गाभा अग्निजन्य Basalt खडकाचा आहे. माळशेज घाटाच्या उत्तरेकडे ह्याच खडकाचा स्वभावधर्म बदलल्यासारखा वाटतो. उत्तरेकडील पर्वतराजीतील खडक अधिक कणखर असावा, आणि ह्यामुळेच इथल्या बहुतेक किल्ल्यांवर  उत्कृष्ट खोदकाम/कोरीवकाम नजरेस पडते. त्रिंबक मधून १६ नोव्हेंबर  रोजी सकाळी आम्ही ब्रह्मगिरीच्या माथ्यावर जाण्यास निघलो. गावापासून  ब्रह्मगिरीचे पठार साधारणतः १५०० फूट उंचीवर आहे. सुरवातीची वाट ७०० फूट चढून गर्द झाडीच्या टप्प्यावर पोचते. ही  सावलीतली वाट दक्षिणेकडे घळीतील पायऱ्यांच्या वाटेपर्यंत पोचते. याच वाटेवर एक ऐतिहासिक धर्मशाळा लागते.

011

012

014

015 copy

017

ह्या सफरीसाठी निघतांनाच, खडी चढाई, अवघड  वाट आणि स्वतःच्या फिटनेस बद्दल साशंकता असे विविध बागुलबुवा मनात डोकावत होते. पण त्रिपुरी  पौर्णिमेच्या मुहूर्तावर दुर्गभांडारवर रात्रीचा मुक्काम हे आकर्षण फार मोठं होतं. सोबत भक्कम सवंगडी होते म्हणून खूप मजाही आली.

022

021a

पुढचा टप्पा सुमारे ८०० फूटांचा ! ब्रह्मगिरीच्या बेलाग कड्याला भिडणाऱ्या  एका उभ्या घळीतून ६००/७०० पायऱ्यांची कोरून काढलेली वाट थक्क करणारी आहे. सुमारे १२०० वर्षांपूर्वी अशा धर्तीचे सुबक काम करणारे कारागीर आजच्या तंत्रज्ञानाच्या जमान्यात देखील अचंबित करणारे आहेत.

024a

025a

026a

025

027

028

029a

029b

030

031a

032a

१५०० फूटांची चढाई संपवून, समुद्रसपाटी पासून ३५०० फूटांवर  असलेल्या ब्रह्मगिरीच्या पठारावर पोचताच, थंडगार वारा आणि विहंगम दृश्य पाहताच, मिनिटभरातच लागलेली धाप आणि पायातले गोळे ह्यांचा आपल्याला विसर पडतो. इथून  पुढे आम्ही उत्तरेकडील दुर्गभांडारकडे निघणार होतो. बहुतेक मित्रांनी दिलेल्या सल्ल्यानुसार दुर्गाची वाट पश्चिमकड्यावरील जटाशंकराच्या मंदिराकडून जाणारी होती. वरच्या टपरीवर स्थानिक मंडळींकडून पूर्वकड्यावरून जाणारी काहीशी अवघड वाट  असल्याचे कळले. समोर दूरवर दुर्गभांडाराचे उत्तरटोक आणि काहीशी धडकी भरवणारा पूर्व कडा दिसत होता. काही काळ संभ्रमावस्थेत घालविल्यावर, ‘बिकट वाट, वहिवाट’ करण्याचे ठरले. उजवीकडे पोटात खळगा पाडणारी १००० फूटांची आ वासलेली  दरी असणार होती. एकमेकांची साथ होतीच, परंतु ह्या घसरड्या वाटेवर काळजी घेणे अत्यावश्यक होते.

032b

032c

032d

032e_copy

032f

032g

033

033a

अहो आश्चर्यम ! आम्ही ब्रह्मगिरीच्या उत्तर टोकावर पोचलो. दक्षिणोत्तर पसरलेले सुमारे १०० फूट लांब आणि २ फूट रुंद टाकं पश्चिमेकडच्या  कड्या लगत दिसलं. जवळ जाताच लक्षात आलं, सुमारे २०० फूट खोल उतरत जाणारा दगडात कोरून काढलेला तो एक जिना होता ! उत्तरेकडच्या टोकाकडे पोचताना, दुर्गभांडार समोर उभा ठाकतो. मेंदूला पोखरणारा एकच प्रश्न होता, याला पोचणारी वाट  कुठे आहे? पाताळात उतरणाऱ्या पायऱ्यांनी अर्धं उत्तर सापडलं होतं !

034

034b

034c

038

040

छोटेखानी खिडकीवजा दरवाज्यातून सरपटत  बाहेर पडल्यावर, आपण दुर्गभांडारला जोडणाऱ्या एका चिंचोळ्या धारेवर पोचतो. आम्ही हिचं नाव ठेवलं ‘बाल्कनी’. ही  धार सुमारे ३५० फूट लांब आणि जेमतेम १० फूट रुंद आहे. दोन्ही बाजूस १००० फूट  कोसळत जाणारी खाई होती. दुर्गभांडारच्या कड्याच्या पोटातून कोरून काढलेय तश्याच पायऱ्यांच्या वाटेने आपण माथ्यावर पोचतो.

041

042

043

043a

043b

043c

044

045

047

047a

दुर्गभांडार दक्षिणोत्तर पसरलेला आहे. माथ्यावर दोन घरांची पुसट जोती आणि पाण्याची दोन टाकी आहेत. टाक्यांचं पाणी गोड आणि चवदार! भणाणणाऱ्या वाऱ्यात वस्तीसाठी  चांगला निवारा नाही. उत्तरेच्या टोकावर बुरुजासारखी, इंग्रजी L सारखी कोरून काढलेली जागा आहे. इथे पोचतांना, शेवटची पायरी उरात धडकी भरवणारी! अचानक १००० फूट खाली तळात दिसणारं तळेगाव कासुर्ली. इथे फार जपून, नाहीतर निश्चित गच्छंति !!!

047b

047c

048

बुरुजावरील मुक्कामाच्या ठिकाणी आम्ही दुपारी चार वाजताच पोचलो. सभोवतालचं  दृश्य अवर्णनीय होतं. पश्चिमेकडे तळेगावचा जलाशय, आग्नेयेकडे  खोलवणात   दिसणारी  त्रिंबकनगरी. ब्रम्हगिरी परिसरातच भाविकांच्या गर्दीमुळे माकडांचीही गर्दी आहे. पुढील सुमारे अडीच तास पूर्वजांचे अनेक प्रतिनिधी आम्हाला वाकुल्या दाखवून गेले. काठी उगारताच फिस्कारत अंगावर येणारे भाऊबंद तापदायक होते. जागता पहारा आवश्यक होता. या ससेमिऱ्यातून सुटकेची वाट पाहतांना, मी अनावधानाने  ‘गंगा तेरा पानी अमृत’ असं  गाणं  भसाड्या आवाजात गायला सुरवात केली. आणि कोण आश्चर्य! माकड चेष्टा अर्धवट सोडून सर्व टोळी अचानक पसार झाली. गाण्याचे शब्द किवा भसाडा आवाज, कशात जादू होती कोण जाणे !

048acopy

048e

048f

048g

048h

048icopy

049

050

051

053

054

फरफरणाऱ्या थंडगार वाऱ्याव्यतिरिक्त निःशब्द शांतता, अगदी जवळून तरंगत घिरट्या घालणारी गिधाडं, मधेच चित्कारणारे  ससाणे – सारं वातावरणच अद्भुत होतं. हळूहळू दरीतील  दिवे उजळू लागले.  त्रिंबकेश्वराच्या मंदिरातून  उमटणारा घंटानाद आणि कुठल्याश्या आरतीचे स्वर, मावळतीला अंधुक होत जाणारं  लालभडक सूर्यबिंब, तर अंजनेरीच्या दिशेला  उगवणारा त्रिपुरी पौर्णिमेचा चंद्र, आमच्या नकळत आम्हीही निःशब्द  झालो होतो. हाताला सुखावणारा चहाचा उबदार स्पर्श होता, कुठलीही घाई नव्हती, विवंचना नव्हत्या, अलगद जाणवणारी थंडी होती, दुर्गभांडारच्या उत्तर टोकावर म्हटलं तर आम्ही स्थानबद्ध होतो. दगडात कोरून काढलेल्या कातळमायेच्या  कुशीत मन मात्र स्वछंदपणे  विहंगाप्रमाणे एका तरल अवस्थेत तरंगत होतं.

055

056

057

060

061

064

065

end_text

301

Standard

39 thoughts on “DURG BHANDAR

  1. Shivkanya says:

    Amazing !Thank you for sharing your thrilling experience!!! This reminds me my days in Nashik and its mountainous surrounding. Beautiful !

  2. Naveeen says:

    good pics..i hv been there in first week of november ..also seen Brahmagiri and Anjani hill.

    Brahmagiri trrk was OK but Anjani Parwat was really good..where lord Hanumaan was born.

  3. Arvind Janardan Bhide3 says:

    एक अप्रतिम ,व काळजात धडकी भरवणारे सचित्र प्रवास वर्णन ग़िरि भ्रमणाची आवड असणाऱ्या धाडसी व्यक्तींनी जाण्याचे ठिकाण . फोटो पण छान व काळजाचा ठोका चुकविणारे . धन्यवाद .
    अरविंद भिडे

  4. Mahesh Sonawane says:

    Farach cchan safar ghadli Durg Bhandar chi……
    Photography aapratim….. ani varna suddha titkich sundar….
    Well Done !!!! Abhinanadan…
    Mahesh Sonawane
    9420696264 Pune

  5. Ravindra Abhyankar says:

    Dear Friends,
    Sarvach Keval Apratim! Photographs ani lekh!
    Janyachi anavar ichcha!
    Mage mi bhar pavasat (1985 chya Shravanat) andharya sandhyakali tikade janyacha prayatna kela hota. Gavkaryanchya ani eka mitrachya shahanpanane vachalo mhanayche!
    Aaplyala bhetayache kase?Contact details!!!
    Aapla sandhancha blog pahayala milel ka? Link??
    Ravi Abhyankar
    Mozambique,Africa.

  6. खूपच मस्त लिखाण… ज्ञानत भर पडली… दुर्गभांडार ला जाताना तुमचा लेख वाचून जाईन नक्की…

  7. Swanand Joshi says:

    नमस्कार,

    खूप छान लेख आहे, सर डोंगरात अजूनही फिरताना बघून छान वाटल, परवा स्की च्या प्रोजेक्ट साठी याचा भागात होतो (पहिने नवर, नवरी सुळका, Sunday १ आणि अजेनेरी नवर सुळका)तेंव्हा तुमच्या लेखाची आठवण झाली, आसो…शुभेच्या

    स्वानंद जोशी
    ~ स्वन्ड्या

  8. Namaskar Sir,

    Maza naav Apurva Oka. Amhi mitra mandali yetya weekend la anjaneri-bramhagiri-durgabhandar la jaycha bet karat ahot. Durgabhandar wishayi phar akarshan ahe, parantu group madhil saglech tase navin mhanje 15 ek treks cha anubhav aslele ahet. Tewha ji arund waat ani balcony apan mention keli ahe, ti kitpat ‘kathin’ ahe yacha andaj hawa hota. Shivay chadhayla-baghayla lagnara wel ya wishayi andaj hawa hota.

    apurvaoka2@gmail.com maza email address ahe. Apan email karu shaklat tar khup bara hoil. Ankhi ek wicharaycha hota, tumhi Prakash Paranjape (Rajkarni nave) yana olakhta ka?

    Kind Regards,
    Apurva Oka
    http://www.apurvaoka.com

  9. मुख्य ब्रह्मगिरीच्या पठारावर चढून त्याचे उत्तर टोक आपल्या उजवीकडे ठेवत जटाशंकर मंदिराच्या बाजूने दुर्गभांडारकडे जाणारी पायवाट कमी जोखमीची आहे.

  10. सुंदर छायाचित्रे, अप्रतिम वर्णन – घर बसल्या दुर्ग भांडाराची सफर. कातळात कोरलेल्या पायऱ्या, भुयाराची वाट खरेच स्तिमित करतात, “आधुनिक चितारी” मात्र डोक्यात जातात

  11. तुमच्या तोंडून एखाद्या घुमक्कडीचे वर्णन ऐकणे किंवा वाचणे ही खरी आनंददायी गोष्टी…त्यातही दुर्गभांडार सारखी भटकंती वाचणे एक उत्तम अनुभव आहे…

    त्रिंबकगड हे नाशिकचे बराचकाळ राजनैतिक केंद्र होते…बर्‍याच अखबरात व जुन्या पत्रव्यावहारात, ‘त्रिंबक व इतर किल्ले घेतले’, अशा स्वरूपाचे उल्लेख बर्‍याच मोठ्या प्रमाणावर आढळतात, यावरून त्रिंबकगड हा सर्वात महत्वाचा होता हे स्पष्ट होते…त्र्यंबकेश्वरचा परिसर हा अनादीकाळापासून महत्वपूर्ण स्थान म्हणून गणला गेला आहे…परंतू त्याकडे फक्त धार्मिक अंगानेच बघितले जाते, दुर्दैवाने त्र्यंबकेश्वरच्या राजकीय इतिहासावरची धुळ अद्याप साफ केलेली नाही, नव्या पिढीतल्या संशोधकांपैकी कोणीतरी त्र्यंबकेश्वर हा विषय घेऊन काम करायला हवे…
    सह्याद्री खंडातल्या एका उल्लेखात, सह्याद्री डोंगररांगेचा उगम ब्रम्हगिरीपासून झाल्याचे ऐकिवात आहे…याचा अर्थ दोन खंडांच्या टकरीतून जो ज्वालामुखीचा उद्रेक झाला व ज्यातून सह्याद्री पर्वतरांगांची निर्मीती झाली, त्यांचे केंद्‍बिंदू ब्रम्हगिरी होते का? असा प्रश्न पडतो…

    एका चांगल्या विषयाला चालना दिल्याबद्दल धन्यवाद!

  12. Arvind Kulkarni says:

    The superb story to read with pictures and appropriate words. Excellent one. Felt like trying it once, for sure 🙂
    We have tried quite good number of fotrs, hills and mountains around Nashik, but the details given in the story are really interesting.
    Thanks a lot for the details.

Leave a comment