गरुडभरारी

IMG_20190225_130205

२७ सप्टेंबर १९८९ रोजी लोणावळ्याजवळील राजमाची येथे भारतातील पहिला आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅम ‘भारत पेट्रोलियम’साठी हाय प्लेसेसच्या माध्यमातून आम्ही आयोजित केला होता. गेल्या ३० वर्षांच्या कालावधीत, वर्षात २/३ अशी सुरुवात करून, आता एका वर्षात ७०० पेक्षा जास्त कार्यक्रम आम्ही आयोजित करतो. तात्पुरते कॅम्प, रिझॉर्ट नंतर सिंहगडावरील MTDC रिझॉर्ट आणि ‘टिळक बंगला’, १० वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने घेतले होते. कार्यक्रमांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन आपलं स्वतःचं ‘सेंटर’ असावं असं आमचं स्वप्न होतं. २००४ साली ‘गरुडमाची’च्या स्वरुपात हे स्वप्न प्रत्यक्षात आलं. ताम्हिणी घाटातील ५४ एकर जागेत गरुडमाची येथे २०० जणांची राहण्याची सोय असलेले भारतातील हे पहिलेच Purpose Built स्थायी सेंटर आहे. एव्हाना हाय प्लेसेस परिवारात सुमारे १५० मंडळी सामील झाली होती.

आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी सुरक्षितता अतिशय महत्वाची! हे सर्व कार्यक्रम निर्विघ्नपणे सुखरूप साध्य होण्यासाठी लागणारे साथीदार म्हणजे ‘आउटडोअर एक्स्पर्ट’. १५/२० सदस्यांच्या आउटडोअर डेव्हलपमेंट प्रोग्रॅमसाठी ३/४ आउटडोअर एक्स्पर्ट गरजेचे असतात. सध्या हाय प्लेसेस परिवाराशी संलग्न असे सुमारे १०० हून अधिक आउटडोअर एक्स्पर्ट सामील आहेत. प्रत्येक आउटडोअर एक्स्पर्ट्स कडे गिरीभ्रमण, रॉक क्लायम्बिंग, निसर्ग निरीक्षण, दिशावेध, रेस्क्यू अश्या तंत्रांचे शास्त्रशुद्ध ज्ञान असणे आवश्यक असते. हाय प्लेसेस परिवारातील आउटडोअर एक्स्पर्ट्स साठी नियमितपणे तांत्रिक सरावासाठी प्रशिक्षण आयोजित केले जाते. चाकू, सुरीला अधूनमधून धार लावावी लागते त्याप्रमाणेच हे प्रशिक्षण आवश्यक असते. याच गरजेतून २००६ साली ‘गरुड भरारी’ या संकल्पनेचा जन्म झाला.

‘गरुड भरारी’ ही ४८ तास चालणारी Outdoor Adventure Race आहे. यात ४ ते ५ जणांचे ८ ते १० संघ यात सहभागी होतात. केवळ तंत्राचे ज्ञान असण्यापलिकडे त्याचा प्रत्यक्ष वापर सफाईनं करता येणं गरजेचं असतं. यामुळेच ‘गरुड भरारी’ ही आउटडोअर एक्स्पर्ट्स साठी एक सत्वपरीक्षा असते. २००६ साली या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे होते – महाराष्ट्रातील पहिले एव्हरेस्टवीर ‘सुरेंद्र चव्हाण’. २०१५ साली दुसरी ‘गरुड भरारी’ आयोजित करण्यात आली होती. त्या वर्षी, मुख्य वन संरक्षक श्री. सुनील लिमये आणि एअरमार्शल भूषण गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते.

महाराष्ट्रात गेल्या २० वर्षात गिरीभ्रमण, साहसी उपक्रम यात भाग घेणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सुरक्षिततेची पुरेशी काळजी न घेतल्यानं अपघातांची संख्या देखील वाढली आहे. याच संदर्भात महाराष्ट्र शासनाने नुकत्याच नियम व मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या मार्गदर्शक सूचना व्यवहार्य पद्धतीनं अंमलात आणण्यासाठी, या क्षेत्रांतील अनेक अनुभवी मंडळी एकत्र येऊन शासनाचा निर्णय अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सदर विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. या पार्श्वभूमीवर ‘गरुड भरारी’ सारखे उपक्रम विशेष महत्त्वाचे ठरतात. यावर्षी २५, २६, २७ फेब्रुवारी या कालावधीत ‘गरुड भरारी २०१९’ आयोजित करण्यात आली होती. ५ जणांचे ८ संघ मिळून ४० आउटडोअर एक्स्पर्ट्स नी यात भाग घेतला. २५ तारखेस ही स्पर्धा विंग कमांडर नितीन वेलदे यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करण्यात आली. २७ तारखेस नेव्हीतील निवृत्त कमांडर दिलीप दोंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. २००८ साली कमांडर दिलीप दोंदे यांनी शिडाच्या नौकेतून पृथ्वी प्रदक्षिणा करण्याचा, पहिले भारतीय म्हणून विक्रम स्थापित करण्याचा सन्मान प्राप्त केला. त्यांनी सदर कार्यक्रमात त्यांच्या या साहसी सफरीचे अनुभवकथन करून आउटडोअर एक्स्पर्ट्स ना मार्गदर्शन केले. आम्हा सर्वांसाठीच ही पर्वणी होती.

Image 14

सोबत ‘गरुड भरारी २०१९’ मध्ये भाग घेतलेल्या २ सदस्यांचे अनुभव देत आहे:

    19

 

 ‘गरुड भरारी २०१९’ या स्पर्धेची सांगता नुकतीच २७ तारखेला गरुड माचीवर पार पडली…२५, २६, आणि २७ फेब्रुवारी अशी ३ दिवस ही स्पर्धा होती…तशी आम्हा ‘Captains’ च्या दृष्टीने या स्पर्धेची सुरुवात तेव्हाच झाली होती जेव्हा आम्हाला राहुल पातुरकरने कळवले होते की ह्या वेळेस आमचे संघ, सहकारी आम्ही ‘Captains’ नी न निवडता ते चिठ्या उचलून ठरतील..त्यामुळे नशिबात कोण येईल हे कुणालाच माहीत नव्हते. पण एवढं नक्की होतं की फिटनेस सगळ्यांचा सारखा नसल्यामुळे खूप सराव करणं भाग होतं. ५ फेब्रुवारीला सर्वांना आपले आपले संघ कळले आणि सर्वजण जोमाने सरावाला लागले.

Image 6

आमच्या हातात तसे २० दिवस होते Race ची तयारी करायला. त्यामध्ये गरुडमाचीवर राहणाऱ्या मुलांनी तर जोमाने सरावाला सुरुवात केली. पहाटे उठून धावायला जाणे, क्लाइंबिंग, जुमारिंगचा सराव करणे, सायकलिंगचा सराव करणे इत्यादी गोष्टी प्रत्येक जण आपापल्या परीने करायला लागले. बघता बघता २५ तारीख कधी उजाडली कळलेच नाही. प्रत्येक संघाकडे किमान २५ किलो सामान असणे अनिवार्य केले होते. सर्वांनी त्या हिशोबाने आपल्या बॅगा भरल्या आणि सज्ज झाले. २०१५ साली झालेल्या स्पर्धेपेक्षा ह्या वेळेची स्पर्धा खूप वेगळी असणार होती अशी एक टीप मिळाली होती. पण नक्की काय वेगळं होणार ते २५ तारखेला सुरुवात झाल्यावर कळलं. आमचे लाडके मास्तर उर्फ वसंत लिमये सर, मृणाल मॅडम, आपटे सर आणि भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर नितीन वेलदे यांच्या प्रोत्साहनपर शब्दांनी स्पर्धेची सुरुवात झाली. झेंडा दाखवून स्पर्धा सुरू होण्यापूर्वी प्रेम सरांनी आम्हा सर्वांना ‘उरी’ सिनेमातला “How’s the josh?’ हा प्रश्न विचारला आणि सर्वांनी एक सुरात ‘High Sir!’ असं उत्तर देऊन संपूर्ण ताम्हिणी घाट आमच्या आवाजाने दणाणून सोडला. पहिला दिवस गरुड माचीवरच विविध activity करत पार पडला. त्यादिवशी रात्री मात्र आम्हा सर्वांनी जंगलात जाऊन आपापले टेंट ठोकून मस्त चुलीवर खिचडी बनवून चांदण्यांच्या प्रकाशात ती खाण्याचा आनंद लुटला. रात्री झोपतांना मात्र आज Organizer मंडळींनी फारसं थकवलं नाही याचा अर्थ उद्या श्वास घ्यायलासुद्धा वेळ नसणार आणि छातीतला उरला सुरला सगळा श्वास बाहेर निघणार याची एक भीती मनात ठेवून सर्व जण झोपी गेले.

P1050718 - Copy

दुसऱ्या दिवशी पहाटे उठून प्रत्येकला हातात ५ लिटरचे पाण्याचे भरलेले कॅन (स्वतःच्या बॅग तर असणारच होत्या पाठीवर) घेऊन ट्रेक करायचा होता आणि तो करून डोंगरावर पोचल्यावर खाली येताना आम्हाला आमच्या टीम मधल्या एकाला ‘Stretcher’वर घाकून खाली आणायचे होते. हे करून सर्व जण थकून माचीवर नाश्त्याला परतले तोच नितीन सरांनी सर्वांना एक आनंदाची बातमी दिली…भारताने पाकिस्तान वर हल्ला करून दहशतवादयांचे तळ नष्ट केले होते. हे ऐकताच सर्वांचा थकवा दूर झाला आणि पुन्हा एकदा ‘भारत माता की जय’ आणि ‘How’s the Josh’च्या आरोळयांनी आम्ही ताम्हिणीचे डोंगर दणाणून सोडले. २६ तारखेच्या उरलेल्या दिवसात अजून काही activities केल्या, मग स्वतःचा राफ्ट बांधून त्यात राफ्टिंग, ३४ किमी सायकलिंग आणि मग रात्रीच्या किर्रर्र अंधारात घनदाट जंगलातून ट्रेक करत तो दिवस पार पडला. रात्री झोपायला गेलो तेव्हा शरीरातली सर्व शक्ती संपली होती, पण अजून एक दिवस पार पडायचा होता आणि तो सोपा नक्कीच असणार नाही अशी शंकेची पाल मनात चुकचुकत कधी झोप लागली कळलेच नाही.

MVIMG_20190225_210137

शेवटचा दिवस उजाडला आणि त्या दिवशी आम्हाला ‘गरुडक्षेप’ नावाचा ताम्हिणीतला एक अतिशय अवघड आणि बिकट असा अंगावर येणारा डोंगर चढायचा होता. तो चढून मग १५० फूट Rapelling करून माचीवर परत येऊन स्पर्धा संपणार होती. उरली सुरली सर्व शक्ती आम्ही एकत्र केली आणि त्या डोंगराला भिडलो. पाठ, पाय, गुडघे यापैकी प्रत्येकाचं काहीतरी एक नक्कीच दुखत होतं. पण त्याची पर्वा न करता सर्वांनी तो ट्रेक पूर्ण केला आणि त्या डोंगराला आमच्या इच्छा शक्तीपूढे झुकावंच लागले. Rappeling पूर्ण करुन सर्वांनी race संपवली. गेल्या ३ दिवसात खूप काही केलं होतं, खूप काही शिकायला मिळालं. स्पर्धा असूनही अनेक वेळा अश्या आल्या की समोरचा आपला प्रतिस्पर्धी नसून ‘Outdoor Community’ मधला आपलाच सहकारी आणि मित्र आहे या नात्याने निःसंकोचपण त्याला मदत केली. कोण जिंकलं कोण हरलं ह्याहीपेक्षा पुढे जाऊन ह्या ३ दिवसात आपण काय कमावलं ह्यामधे सर्वजण सुखी होते. हा अनुभवांचा साठाच पुढच्या गरुड भरारीची आणि आमच्यातील एका नवीन नात्याची पायाभरणी करणार होता. सांगता समारंभासाठी बोलावलेली व्यक्ती देखील खूप मोठी होती. शिडाच्या बोटीतून एकट्याने जगप्रदक्षिणा करणारे पाहिले भारतीय कमांडर दिलीप दोंदे सर. त्यांचं मोहिमेचं वर्णन आणि बोलणं ऐकून आम्ही सर्वच भावुक झालो. बक्षीससमारंभ संपला आणि आपटे सर आणि मृणाल मॅडमनी कार्यक्रमाची सांगता केली. हे सर्व संपू नये असं वाटत असलं तरी ते संपलं होतं. सांघिक कामगिरी म्हणजे नेमकं काय हे गेल्या ३ दिवसात समजलं होतं. अशा वेळी हेन्री फोर्ड ह्यांचे शब्द आठवतात – Coming together is a beginning, keeping together is progress, working together is success!

  • शार्दुल संत Team अग्निपंख

IMG_20190226_065141

‘WHAT DOESN’T KILL YOU MAKES YOU STRONGER’

7 फेब्रुवारी ला अजयने गरूड भरारीच्या व्हॉटसअप ग्रुप वर ऍड केलं आणि एका अविस्मरणीय, सर्वशक्ती आणि सर्वबुद्धी पणाला लावणाऱ्या थरारक , रोमांचक स्पर्धेचं रणशिंग फुंकलं गेलं…

यावेळच्या स्पर्धेला संघ निवड ड्रॉ पध्दतीने झाल्याने, सगळ्याच संघांना जिंकण्याची संधी होती आणि प्रत्येक सहभागी खेळाडूला आपल्या साथीदारांना समजून घेऊन, त्यांना बरोबर घेऊन, वेळ प्रसंगी त्याचा भार स्वतःवर घेऊन पुढे जाण्याचं चॅलेंज होतं.

P1050717 - Copy

10 – 15 वर्ष रॉक क्लाइंबिंग, ट्रेकिंग आणि सगळ्या आऊटडोअर स्पोर्ट्सचा दांडगा अनुभव असलेला, मनमिळाऊ, शांत डोक्याचा,जैक स्पॉरो,जॉन स्नो, डॅनहोस् मॅन तसेच बॉब मार्ली उर्फ अजय मोरे आमचा टीम लीडर होता, सुरज , राजू भाई, संतोष झोरे आणि मी – अशी आमची 5 जणांची टीम झाली होती. राजू भाई अबोव्ह 45 असून सुद्धा त्यांचा उत्साह दांडगा होता. मी पण नुकताच लिंगाणा ट्रेक करून आलो होतो म्हणून माझा पण स्लेफ कॉन्फिडन्स वाढलेला होता… सुरज पण एक चांगला आऊटडोअर एक्स्पर्ट आहे आणि संतोष तर तिथलाच असल्यामुळे त्याला परिसराची व्यवस्थित माहिती होती.

सगळेजण गरूडभरारी 2019 साठी काही न काही प्रॅक्टिस पण करतच होते. 24 फेब्रुवारीच्या संध्याकाळी सगळे 8 टीमचे पार्टीसिपंट म्हणजे 40 जण , MDC ला भेटलो. आज पहिल्यांदाच आम्ही OE नाही तर पार्टीसिपंट असल्याने आमची चांगली बडदास्त ठेवलेली होती… सगळे एकत्र आल्यामुळे फुल्ल गप्पा टप्पा, धिंगाणा चालू होता. प्रत्येकाला उद्या पासून चालू होणाऱ्या स्पर्धेची आस लागलेली होती.. आधीच्या म्हणजे गरूडभरारी 2015 च्या सहभागी खेळाडूंचा भाव चांगला वधारला होता.. ते पण काय असेल काय नसेल ते सांगत होते, कोंपिटीशन असून पण सगळे एकत्र येऊन नवीन सहभागी खेळाडूंना माहिती देत होते.

Image 1

25 ला सकाळी 10 वाजता सगळे जण ब्रेकफास्ट करून तयार झाले. जास्तीच सामान वेगळं करून ऑफिसला ठेवलं. प्रत्येक टीमला 25 किलो कमीतकमी वजन कॅरी करायचच होतं आणि परत ऑफिस मध्ये ठेवलेलं सामान परत कधी मिळेल ते माहीत नसल्याने आणि नक्की स्पर्धेत काय काय असेल ते माहीत नसल्याने, ‘think for the best and prepare for the worst’ या आऊटडोअर च्या थंब रुलने सगळ्यांनी सॅक भरल्या होत्या.

P1050719

11 वाजता लिमये सर, पुष्कराज सर आणि मृणाल मॅडम, प्रेम सर आणि इतर सर्व सर लोक , मार्शल्स आले आणि भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर श्री. नितीन वेलदे सरांच्या हस्ते स्पर्धेचं ऑफिशियल फ्लॅग ऑफ झालं आणि सगळ्या टीम पळत वर ODC ला गेलो..

 7:30ला गरुडक्षेप ट्रेक होता…
कालचा नाईट ट्रेक चांगला झाल्याने उरलेली सर्व शक्ती लावून आम्ही आज पण तसाच परफॉर्मन्स करायचा असं ठरवलं होतं. वेळ चालू झाली आणि आमची टीम सगळ्यात पुढे होती.. पहिला चढ कसाबसा पूर्ण केला आणि सपाटी लागली… पण अंगात पळायची ताकत नव्हती.. माझे बाकीचे टीम मेंबर पुढे गेले.. सुरज मला सपोर्ट करायला माझ्या जवळपास चालत होता.. पुढचा टप्पा तर खूपच उभ्या चढाचा होता… आता आपण संपलो असं वाटत होतं, पण एकदाचा तो टप्पा पण पार केला आणि वर पोचलो. आता परत सपाट चाल होती..एकदाचा चढ संपला म्हणून हायसं वाटलं होतं तर उतार चालू झाला, त्यानेपण उरलेली सगळी ताकत संपवली… शेवटी तो ट्रेक संपला आणि आम्ही आलो काला पत्थर च्या रॅपलिंग पॅचवर, जवळपास 150 ft चा पॅच होता, पण आमच्यात सगळ्यांनी मस्त परफॉर्म करत ते फटाफट संपवलं.. आणि आम्ही पळत पळत गरूडभरारीची फिनिश लाईन एकमेकांचे हात धरून एकत्र पार केली…

पण शिकायला खूप मिळालं, स्वतःच्या मर्यादा कळल्या,लीडर कसा असावा, टीम वर्क च महत्व, संयम, चिकाटी, म्हणजे काय ते कळलं..

Image 15

‘HOW’S THE JOSH’ – ‘जय भवानी’ …
अश्या आमच्या वॉर क्रायच्या जयघोषात या स्पर्धेचा शेवट गोड करुन पुन्हा पुढच्या गरुड़ भरारीची उत्सुकता उराशी घेऊन माघारी फिरलो.!

लेखन :- अभिषेक आठवले. Team अश्वमेध

P1050761

         ‘गरुड भरारी २०१९’ यशस्वी होण्यामागे मृणाल परांजपे, पुष्कराज आपटे, प्रेम मगदूम, मिलिंद कीर्तने, सुरेंद्र चव्हाण, राहुल पातुरकर, अमोल पेंडसे, निर्मल खरे, शर्मिला, वंदना आणि इतर हाय प्लेसेस सदस्य यांचे अविरत कष्ट आणि संयोजन होते. तीस वर्षांच्या काळाकडे मागे वळून पाहतांना एक मस्त समाधान आहे, नवीन स्वप्नांची चाहूल आहे. मला खात्री आहे की हाय प्लेसेसचा गरुड अनेक भराऱ्या घेत राहील!

वसंत वसंत लिमये

Standard

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s